‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पद्मश्री रमेश पतंगे आणि ज्येष्ठ लेखक दिनेश गुणे यांच्या विशेष मुलाखतींचे प्रसारण

मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘संविधान हत्या दिनानिमित्त’ ज्येष्ठ विचारवंत, लेखक व संपादक पद्मश्री रमेश पतंगे तसेच ज्येष्ठ लेखक आणि संपादक दिनेश गुणे यांच्या मुलाखती प्रसारित करण्यात येणार आहेत.

भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार मिळाले आहेत. संविधानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. देशात २५ जून १९७५ रोजी लागू झालेल्या आणीबाणीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमधून भारतीय संविधानाची निर्मिती, आणीबाणी लागू करण्यामागील कारणे व त्याचा नागरिकांवर झालेला परिणाम या विषयांवर श्री. पतंगे व श्री. गुणे यांनी या दोन्ही कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

 दिलखुलास कार्यक्रम

पद्मश्री रमेश पतंगे यांची निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतलेली मुलाखत बुधवार, दि. २५ आणि गुरूवार दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे.

श्री. दिनेश गुणे यांची निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दि. २७ जून २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० आकाशवाणी व ‘News On AIR’ अॅपवर प्रसारित होणार आहे.

जय महाराष्ट्र कार्यक्रम

पद्मश्री रमेश पतंगे यांची निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतलेली मुलाखत बुधवार, २५ जून २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *