रायगड जिल्ह्यातील क्रशर चालकांचे बंद ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय लवकरच – महसूलमंत्री बावनकुळे

मुंबई, दि. २९ – रायगड जिल्ह्यातील क्रशर चालकांचे बंद असलेले ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करणे आणि सिडको क्षेत्रातील जमीन सपाटीकरणाबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील स्टोन क्रशर संघटना व खाण व्यावसायिकांच्या प्रलंबित समस्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार विक्रांत पाटील आणि रायगडमधील खाण व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीमुळे एप्रिल महिन्यापासून अडचणीत सापडलेल्या स्थानिक क्रशर व खाण उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. खाण मालकांनी एप्रिल महिन्यापासून क्रशर व खाण परिसराला सील ठोकण्यात आल्याचे सांगितले. लीज नूतनीकरणाचे अर्ज प्राप्त झाले आहेत तथापि प्रादेशिक नियोजन झोनमध्ये क्रशर चालवण्यास नियमानुसार परवानगी देता येत नसल्याचे सिडकोमार्फत स्पष्ट करण्यात आले.

यावर महसूलमंत्र्यांनी संबंधित भाग हा मूळ खाण क्षेत्र असेल, तर त्याचा समावेश प्रादेशिक उद्यान क्षेत्रात होत नाही, केवळ गार्डन किंवा इतर पार्कसाठी आरक्षण असलेल्या ठिकाणी नियमाधीन राहून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *