व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांचे मुंबईत उत्साहात स्वागत

मुंबई, दि. ५ : व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांचे मुंबईतील ऐतिहासिक ताज महाल पॅलेस हॉटेल येथे आगमन झाले. भारतीय आदरातिथ्याची परंपरा जपत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

हॉटेलमध्ये आगमनानंतर रॉड्रिग्ज यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भारतीय संस्कृती, कला आणि परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान भारतीय लोककला, संगीत आणि सांस्कृतिक विविधतेचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपतींनी या कार्यक्रमाचे कौतुक करत भारतीय संस्कृतीबद्दल विशेष प्रशंसा व्यक्त केली.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *