जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ

मुंबई, दि. २१ : राज्यातील दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत होती. मात्र, राज्यातील केवळ ५० टक्के जुन्या वाहनांवरच एचएसआरपी बसविण्यात आल्याचे आढळून आल्याने शासनाने ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वाहन मालकांनी निर्धारित मुदतीत एचएसआरपी बसविणार नाही किंवा त्यासाठी आगाऊ वेळ (अपॉईंटमेंट) घेणार नाहीत, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायदा व नियमांनुसार एक हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येणार आहे.

वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in?utm_source=chatgpt.com या संकेतस्थळावर जाऊन ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *