प्रजासत्ताक दिनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि.  २६ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण व कौशल्य विकास विभागातंर्गत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य अंतर्गत चांगली कामगिरी पार पाडलेल्या रुग्णालयांचा सत्कार यावेळी करण्यात आला. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांच्यातर्फे “जीवनाला हो – अमली पदार्थांना नाही म्हणा” हि शपथ घेण्यात आली. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी  श्री. क्षीरसागर यांनी  सर्वांना शुभेच्छा दिल्या

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *