पाटण तालुक्यातील मौजे हुंबरळी येथील कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. २५: सातारा जिल्ह्यातील भूस्खलन गावांचे पुणे येथील भूगर्भ शास्त्र विभागामार्फत सन 2023-204 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार पाटण तालुक्यातील मौजे हुंबरळी येथील 236 कुटुंबांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.  यानुसार या कुटुंबांना पुनर्वसनासाठी आजुबाजुच्या 2 ते 3 किलोमीटर परिसरात शासकीय, निमशासकीय जागा शोधावी.  अशी जागा उपलब्ध नसल्यास प्रचलीत नियमानुसार या कुटुंबांच्या पसंतीनुसार खासगी वाटाघाटीने जागा खरेदी प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सातारा येथील पालकमंत्री कार्यालयात हुंबरळी गावच्या पुनर्वसनाचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संताष रोकडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे आदी उपस्थित होते.

1.07 द.ल.मि.चा हुंबरळी पाझर तलाव असून यातील काही जमिन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येते. त्यासाठी स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा. मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल.

वांग-मराठवाडी प्रकल्प बाधितांच्या जमिनी वाटपातील अडचणी व नागरी सुविधांबाबतही यावेळी त्यांनी निर्देश दिले. पर्यटन विभागामार्फत डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कोयना महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याचाही आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *