महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबईदि.२९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकासरोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवारकक्ष अधिकारी घनश्याम जाधवसहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिवांनीही केले अभिवादन

महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील उपस्थित अधिकारीकर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन केले.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *